१० सप्टेंबर रोजी भारतीय विद्या भवन मध्ये ‘आनंद मल्हार’ नृत्याविष्कार -भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम


१० सप्टेंबर रोजी भारतीय विद्या भवन मध्ये ‘आनंद मल्हार’ नृत्याविष्कार ——————————–भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘आनंद मल्हार’ या नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम रविवार, १० सप्टेबर २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे. ‘
ओजस,पुणे’ यांच्यातर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत केला जाणार आहे. कामाक्षी हंपीहोली( कथक),रिद्धी पोतदार(भरतनाटयम),अमृता सिंग( कुचिपुडी),जीत घोष(ओडिसी),दिशा रावत(कथक) हे सहभागी होणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८० वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली….