पिंपरी चिंचवड शहरातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा:कोकण खेड युवाशक्ती ची मागणी

पिंपरी (ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या परिसरात मध्ये मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला, ओव्हर ब्रिजखाली, बेवारसी मोकट श्वान टोळक्याने एकत्र बस्तात. येणाऱ्या जाणऱ्या नागरिकांवर जोरात भुंकत धावून जातात व चावतात, नागरिक स्वतःला वाचवताना मोठमोठे अपघात होतात त्यामुळे नागरिक गंभीर जखमी झालेले आहेत.कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहर पुणे यांच्यावतीने मा.आयुक्त साहेब, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बेवारसी-मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी चे निवेदन कोकण खेड युवाशक्ती अध्यक्ष रुपेश मोरे यांनी केली आहे


त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक सकाळी-संध्याकाळी वॉकिंगसाठी बाहेर पडतात, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शाळे कॉलेज करीता जा ये करतात, महिला कामगार आणि कामगार कर्मचारी कामानिमित्त शहरांच्या विविध ठिकाणी ये जा करित असतात, तसेच इंडस्ट्रियल कंपन्यामध्ये कामगार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

हे कामगार सकाळी, दुपारी आणि रात्रपाळी अशे शिफ्ट मध्ये कामे करुन टु-व्हिलर किंवा वाहनाने ये जा करीत असतात अशा या कर्मचारी वर्गावर बेवारसी मोकाट श्वाने अंगावर धावून येतात व चावतात एकत्रीत हल्ले करतात त्यामुळे शहरावर भितीचे वातावरण झाले आहे.


यासदर्भात महानगरपालिकेने ठोस पाऊले उचलावीत यासाठी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था अध्यक्ष श्री रुपेश मोरे यांनी ईमेलद्वारे शहरातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी विनंती आयुक्तांकडे केली आहे

Latest News