झाडे लावून, वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू,आयुक्त शेखर सिंहं

*पिंपरी चिंचवड महानगरपालिका*

*पिंपरी, दि. १५ सप्टेंबर २०२३:-* ‘’महापालिका आणि देहुरोड सीमेवर वृक्षारोपण करण्यात येत असलेल्या ५० हजार झाडांमुळे भविष्यातील वाढत्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर या हरित पट्ट्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला चांगला उपयोग होईल, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

आम्ही भारताचे सुजाण नागरिक शपथ घेतो की, जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू, आम्ही या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला या पर्यावरणाला आमच्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊ.

आम्ही या देशाला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी कटीबद्ध राहू व आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही’’, अशी वसुंधरा शपथ घेऊन निगडी-देहुरोड सीमेवर ५० हजार रोपांच्या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाची आज सुरूवात झाली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वनप्रकल्प विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी-देहुरोड सीमेवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते वृक्षाचे रोप लावून वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास वन प्रकल्प विभागाच्या पुणे विभागीय व्यवस्थापक सारिका जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, देहुरोड छावणी परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, माजी नगरसेवक सचिन चिखले तसेच ज्ञानदीप माध्यमिक व सौ. अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य सुबोध गलांडे, रमेश तिरखुंडे, बाळासाहेब पवार तसेच तरटे, सुहास चौधरी, ऋचा लाखे, रुपीनगर क्रिकेट क्लबचे प्रवीण बोडके, महेश भालेकर सुधीर पवार, राम धोत्रे, गो ग्रीन वृक्ष संवर्धन संस्थेचे प्रशांत भालेकर, सुधीरर पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते धनजंय शेडबाळे, बापूराव सोनवणे, सुनिल बहिरट, अशोक वायकर, भोकरे आदी उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उद्यान विभागप्रमुख उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी वृक्षारोपण मोहीमेची माहिती दिली. या परिसरात ५० हजार झाडे टप्प्या टप्प्याने लावण्यात येणार असून त्याची निगा व जोपासणा वनप्रकल्प विभाग पुणे यांच्या वतीने करण्यात येणार आहे, हा एक महापालिकेचा चांगला उपक्रम असून त्याचा उपयोग भविष्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पंचप्रण शपथही घेण्यात आली तसेच उद्यान विभागात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महापालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला

त्यामध्ये सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, उद्यान निरिक्षक दत्तात्रय आढळे, सहाय्यक उद्यान निरिक्षक ज्ञानोबा कांबळे, दयानंद चव्हाण, असिस्टंट हॉर्टीकल्चर सुपरवायझर चंद्रकांत गावडे, भानुदास तापकीर, सुनिल दुदुसकर, संदिप गायकवाड, गोपाळ खैरे, राजाराम शिरसाठ, भाऊसाहेब सगरे, उद्यान सहाय्यक नंदकुमार ढवळसकर, अविनाश बालवडकर, सुरेश घोडे, सुरेश कोळेकर, संतोष रायकर, अजयकुमार जाधव, सिद्धेश्वर कडाळे, अरविंद कदम, किरण शिरसाठ, शिवाजी बुचडे, अनिल गायकवाड, प्रदीप गजरमल, हनुमंत चाकणकर, सुहास सामसे, सचिन शिणगारे, गणेश राणा, नायक खान या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी केले तर आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

Latest News