इतर समाजाच्या आरक्षणाला कुठलीही हानी न पोचवता मराठा आरक्षण देण्यासाठी शासनाचे प्रयत्न.:मुख्यमंत्री


पुणे (ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-) मराठा आरक्षणाच्या विषयावर भूमिका स्पष्ट केली.इतर समाजाच्या आरक्षणाला कुठलीही हानी न पोचवता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल होता कामा नये. मनोज जरांगे यांची मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी असली तरी ते शक्य नाही.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यास `ओबीसीं`चा विरोध आहे.
त्यामुळे स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितले
. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभाजवळ ध्वजवंदन करण्यात आलेज्यांच्याकडे पूर्वी `कुणबी`चे रेकॉर्ड होते, पण त्याच्या नोंदी बदलल्या असतील, तर सर्वे करून अशा मराठा समाजाला ओबीसीचा लाभ मिळेल, त्यासाठी ओबीसींचा आक्षेपही नाही
.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याचा कुठलाही विचार राज्य शासनाच्या मनात नाही. न्यायालयातून रद्द झालेले आरक्षण मराठा समाजाला पुन्हा मिळवून देण्यासाठी शासनातर्फे युद्धपातळीवर काम सुरू आहेकॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसविले आणि गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवर सौम्य लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले, असा आरोप केला होता.
यावर मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, असा टोला लगावला. काही तरी बोलून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेऊन सांगावे की, मी असा माणूस आहे का? माझ्या पोटात एक अन् ओठात एक असा माझा स्वभाव नाही.
लाठीमाराच्या घटनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे, मीदेखील दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकावे, यासाठी ज्यांनी काहीच भूमिका घेतली नाही, आज ते आरक्षणाच्या आडून राजकारण करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.