पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकारिणी जाहीर.:भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे


पुणे (ऑनलाइन परिवर्तनाचा सामना) – भाजपच्या पुणे कार्यकारिणीत पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे पदाधिकारीच फक्त घोषित करण्यात आले आहेत. इतर पदाधिकारी आणि सदस्य अद्याप नेमण्यात आलेले नाहीत. त्यानंतर ती पिंपरी-चिंचवडसारखीच ही कार्यकारिणी मोठी होण्याची शक्यता आहे.
यात तूर्तास १८ उपाध्यक्ष, आठ सरचिटणीस, १८ चिटणीस आणि सहा मोर्चा अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यातील मोर्चा अध्यक्षांतील करण मिसाळ यांची नेमणूक लक्षवेधी आहे
. या वेळी करण मिसाळ यांचे प्रमोशन केले असून, त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातून मिसाळ कुटुंबातील राजकारणाचा वारसा पुढे चालू राहिला आहे आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकारिणी जाहीर केली आहे
. पुण्याची पहिल्या टप्यातील ५० जणांची कार्यकारिणी घाटे यांनी जाहीर केली. त्यांनी आपल्या टीममध्ये महापालिकेतील कामांचा अनुभव असलेल्या जुन्या व नव्या चेहऱ्याना संधी दिली आहे. यातील एका नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे,
ते म्हणजे करण मिसाळकरण हे पर्वतीच्या भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचा मुलगा आहे. अगोदर भाजयुमोचे शहर सरचिटणीस म्हणून काम त्यांनी केले आहे. आता नव्या नियुक्तीने पक्षाच्या शहर बॉडीत जबरदस्त एन्ट्री झाली आहे. तीन टर्म आमदार असलेल्या माधुरी मिसाळांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.
मिसाळ यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाच्या निरीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांचे दीर बाबा मिसाळ हे पक्षाचे नेते असून, शहरात सरचिटणीस होते. आता त्यांच्या घरातून नवा चेहरा कोण याची उत्सुकता होती. त्यात करण यांनी बाजी मारली आहे.
राघवेंद्र मानकर यांच्याकडे असलेले मोठे पद त्यांना देण्यात आले. त्यातून आगामी महापालिका निवडणुकीत तो उतरू शकतो, अशी चर्चा या नेमणुकीनंतर पुण्यात सुरू झाली आहे.दरम्यान, या कार्यकारिणीतून पक्षांतर्गत विरोधकांना वगळल्याचे दिसून येते. त्यासोबतच जुन्या कार्यकारिणीतील काही जणांचे प्रमोशन झाले आहे, तर काही जणांना नवी जबाबदारी दिली आहे. हे करीत असताना सर्वच आठ विधानसभा मतदारसंघांतील सर्वच भागातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न घाटे यांनी केला आहे.