महिला आरक्षणाचे श्रेय कुणाला द्यायचे असेल,तर ते फक्त बाबासाहेबांनाच द्यावे- प्रकाश आंबेडकर

ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- आरक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठ काँग्रेस अन् भाजपने काही केलेच नाही. महिला सक्षमीकरणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनीच काम केले आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे महिला आरक्षणाचे श्रेय कुणाला द्यायचे असेल,तर ते फक्त बाबासाहेबांनाच द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.संसदेच्या विशेष अधिवेशनात काल मांडण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी श्रेय घेणाऱ्या भाजप आणि काँग्रेसला फटकारले आहे.”या महिला आरक्षण बिलाच्या श्रेयासाठी भांडणारी काँग्रेस आणि भाजप हे दोघेही भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आणि जात, लिंग, धर्म आधारित सर्व प्रकारचा भेदभाव संपविण्यासाठी बाबासाहेबांच्या क्रांतीकारी कार्याला विसरलेत आणि बगल देत आहेत,” असा हल्लाबोल प्रकाश आंबे़डकरांनी केला आहे”इथल्या पीडित समूहासाठी राजकीय आरक्षणाची मागणी करणारे बाबासाहेब आंबेडकर होते. काँग्रेसने पंचायत राज बिल आणण्याच्या दशकांपूर्वीच महिला सशक्तीकरणाचे सर्वात मोठे पाऊल असलेल्या हिंदू कोड बिलाचा मसुदा बाबासाहेबांनी तयार केला होता,” याकडेही आंबेडकरांनी लक्ष वेधले”महिला आरक्षण बिलाचे आम्ही स्वागत करतो, असे म्हणतानाच आरएसएस हे एससी, एसटी विरुद्ध ओबीसी असे भांडण लावत आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. तसेच मोदींना हे आरक्षण २०३४ पर्यंत द्यायचे नसून फक्त या अर्धवट, भेदभाव आणि धूळफेक करणाऱ्या बिलातून राजकीय फायदा घ्यायचा आहे,” असेही ते म्हणाले. “मोदी सरकारने आणलेलं महिला आरक्षण विधेयक मनुस्मृतीच्या रुपात आहे. कारण त्यात ओबीसी महिलांना, केंद्रशासित प्रदेशातील ओबींसीसह एससी, एसटी महिलांना वगळण्यात आले आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच ते जम्मू-काश्मीरमध्ये लागू होईल का नाही, याबद्दल त्यात काहीच म्हटलेले नाही, त्यावर जम्मू काश्मीर देशाचा भाग नाही का?” अशी विचारणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

Latest News