भारतीय विद्या भवनमध्ये २३ सप्टेंबर रोजी ‘ लावणी ठसका ‘ कार्यक्रम…

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या
सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे ः ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘लावणी ठसका ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनीवार ,२३ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे. हार्मनी इन्स्टिट्यूटचे संचालक उपेंद्र लक्ष्मेश्वर हे हा कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत.

या कार्यक्रमात, गिटार,माउथ ऑर्गन,की -बोर्डवर मराठी लावण्या,सुप्रसिद्ध हिंदी गाणी सादर केली जाणार आहेत. अविनाश कुलकर्णी, राजू जावळकर, संदीप शिंगाडे, कैवल्य खिस्ती, दीपाली उपाध्ये, डॉ. सरिता साखळकर, प्रीती करमरकर, सौरभ दामले, सोनाली आगटे ,मिलिंद आगटे, राजवीर ससाणे हे कलाकार सहभागी होणार आहेत.संगीत संयोजन कुमार शेल्डेकर यांचे तर निवेदन शशांक दिवेकर यांचे आहे.

भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८२ वा कार्यक्रम आहे .

Latest News