पुणे फेस्टिव्हल,हा देशातील हा संस्कृती महोत्सव:.. खा हेमा मालिनी


पुणे-ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-
हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘राधे राधे आज राधाष्ट्मी आहे आणि आज महिला महोत्सवाचे उद्घाटन देखील आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. मी मथुरावरून येत आहे. आजचा दिवस खूप शुभ आहे. याठिकाणी येऊन मला खूप आनंद होत आहे. आय लव्ह पुणे, आय लव्ह पुणेकर अस सांगून त्या म्हणाल्या की, गेली २० वर्षे मी राजकारणात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण विधेयक आणल त्यामुळे महिलांना ३३% आरक्षण राजकीय आरक्षण मिळणार आहे. हे फार महत्वाचे आहे.
त्या पुढे म्हणाल्या की , या पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शनात अनेक आर्टिस्टने येऊन माझी पेंटिंग बनवली. पण, आज ‘ड्रीम गर्ल’ वर पूर्ण सब्जेक्ट बनविण्यात आला. याबद्दल आभार व्यक्त करून त्या म्हणाल्या की, आपण माझ्याबद्दल या प्रदर्शनातून व्यक्त केलेल्या भावनांमुळे मी भारावून गेले आहे.
यापुढे त्या म्हणाल्या की, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी तब्बल ३५ वर्ष देशातील हा संस्कृती महोत्सव चालू ठेवला याबद्दल यांचे अभिनंदन केले पाहिजे. संपूर्ण देशातील कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतात. या मंचावर आपली कला सादर करणारे उगवते व नवोदित कलाकार या देशात चमकत आहेत ही कौतुकाची बाबा आहे.
पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला महोत्सव सुरु केला. त्यामुळे, पुण्यातील हजारो महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. ही आनंदाची बाब आहे. या महिला महोत्सवात विविध स्पर्धांच्या संयोजकांचे देखील त्यांनी कौतुक केले.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिला महोत्सवतील ब्रायडल मेक अप स्पर्धेच्या संयोजिका दिपाली पांढरे यांनी स्वागत केले, पाककला स्पर्धेच्या संयोजिका करुणा पाटील यांनी प्रस्तावना केली, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या संयोजिका सुप्रिया ताम्हाणे यांनी आभार मानले
. नीरजा धिरेन्द्र यांनी सूत्रसंचालन केले. तसेच, मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या संयोजक अमृता जगधने आणि महिला नृत्य स्पर्धेच्या संयोजक संयोगिता कुदळे यांनी हेमाजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महिला महोत्सवातील पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शनाच्या संयोजक अॅड. अनुराधा भारती यांनी हेमा मालिनी यांना हँडपेंटेड साडी व पंजाबी दुपट्टा भेट दिला.
याप्रसंगी, वर्षा कुलकर्णी, सहयोगी संपादक सकाळ, तनिष्का व्यासपीठ, माधुरी घुले आणि अनुराधा हटकर समन्वयक कस्तुरी क्लब पुढारी, मेघना पालकर समन्वयक संस्कृती क्लब पुण्यनगरी आणि डॉ. अंजली जोशी मिडास टच इन्स्टिट्यूट यांचा हेमा मालिनी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
एक सशक्त व्यासपीठ महिलांसाठी उपलब्ध करून उत्कृष्ट महिला संघटन आणि सक्षमीकरण केले या कार्याचा गौरव म्हणून पुणे फेस्टिवल महिला महोत्सवातर्फे या समन्वयकांचा सन्मान हेमा मालिनी यांच्या हस्ते करण्यात आला.
बालगंधर्व कलादालनातील या पेंटिंग्ज प्रदर्शनात ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी वर आधारित विविध लक्षवेधी पेंटिंग्ज लावण्यात आली होती. हे प्रदर्शन बघताना हेमा मालिनी यांनी प्रत्येक पेंटिंगपाशी त्या पेंटिंगच्या चित्रकार युवतीस उभे करून स्वत: मोबाईलमधून सेल्फी फोटो आठवणीसाठी काढून घेतले. ही पेंटिंग्ज बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती
. देशातील आकृती ग्रुपच्या दीडशे महिलांनी ही पेंटिंग्ज चितारली होती. हे प्रदर्शन सोमवार दि. २५ सप्टेंबरपर्यंत बालगंधर्व कलादालन येथे रोज सकाळी १०.०० ते रात्री ८.०० यावेळेत प्रेक्षकांसाठी विनामुल्य खुले आहे.
हे ‘कॅनव्हास ऑफ अ ड्रीम गर्ल’ पोट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन असून याचे यंदाचे चौदावे वर्ष आहे
. यामध्ये पेन्सिल स्केच, चारकोल, ऍक्रेलिक कलर, ऑइल पेंट, वॉटर कलर अशा सर्व माध्यमातून १८ x २२ पासून२२ x ३० इंच साइजच्या कॅनव्हासपर्यंत चित्र प्रदर्शित केली आहेत. त्याचप्रमाणे हेमा मालिनी यांचे ऑइल पेंट व वॉटर कलर अशा दोन्ही माध्यमातून लाईव्ह पोट्रेट काढण्यात आली.यंदाच्या वर्षी या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे,’आकृती’ ग्रुपच्या पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या ५० महिला चित्रकारांनी ८ फुट रुंद व १८ फुट लांब, कॅनव्हासवर पुणे फेस्टिवलच्या प्रसिद्ध ‘गणेशाची प्रतिमा’ असलेला लोगो, हाताने पेंट केला व दोन्ही बाजूला ४-४ अशा अष्टविनायकाच्या प्रतिमा रंगवल्या.
पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सव अंतर्गत आयोजित या पेंटिंग स्पर्धेत डॉ.राजेत्री कुलकर्णी प्राध्यापिका एस.एन.डी.टी. कॉलेज व श्रीमती हेमा जैन माजी प्राध्यापक जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. राहुल बळवंत, प्रिन्सिपल अभिनव कला विद्यालय, पुणे यांच्या हस्ते बक्षिसे दिली गेली. याचे निकाल पुढीलप्रमाणे, पोर्ट्रेटमध्ये प्रथम पारितोषिक उर्मिला दुरगुडे (ठाणे),द्वितीय पारितोषिक अनुराधा कुलकर्णी (पुणे). पोस्टरमध्ये प्रथम पारितोषिक स्वाती केणे (नागपूर) आणि द्वितीय पारितोषिक जसविंदर सिंग(लुधियाना).फिल्म माझे करिअर आहे
, नृत्य माझी साधना आहे आणि पॉलीटिक्स माझी सेवा आहे. असे भावपूर्ण उद्गार अभिनेत्री, नृत्यांगना व पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन खा. हेमा मालिनी यांनी काढले. ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिला महोत्सवाचे बालगंधर्व कलादालन येथे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, पदाधिकारी कश्यपसिंह चुडासमा, बाळासाहेब अमराळे अतुल गोंजारी, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे व चित्रकार महिला या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.