रोटरी वाल्हेकरवाडीच्या सहकार्याने पवनानदी जाधवघाट गणेशउत्सव नियोजन यशस्वी,


रोटरी वाल्हेकरवाडीच्या सहकार्याने पवनानदी जाधवघाट गणेशउत्सव नियोजन यशस्वी, निर्माल्य संकलन उपक्रम
गणेशभक्ताचा 100% प्रतिसादरोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने पवना नदी संवर्धन करण्यास रावेत वाल्हेकरवाडी येथील पवनेच्या जाधव घाट परिसरात निर्माल्य संकलन उपक्रम, गणपती विसर्जन हौद, गणपती दान असे विविध उपक्रम राबविण्यात आले होते. गणेशोत्सव 2023 मध्ये दीड दिवस, पाचवा, सातवा आणि दहावा दिवशी सर्व यंत्रणा योग्य समनव्यय साधत आणि नागरिकांना मार्गदर्शन करत 100 टक्के निर्माल्य संकलन तर केलेच
शिवाय नागरिकांना मार्गदर्शन करत त्यातील प्लास्टिक वेगळे करून घेतले. नागरिकांनी ह्या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत उपक्रमाचे कौतुक केले, शिवाय अभिमानाने निर्माल्य वेगळे केल्या नंतर तेथील सेल्फी पॉईंट वर फोटो ही काढले.यावेळी मोठे मंडळाचे गणपती वगळता 100 टक्के घरगुती मूर्ती हौदात विसर्जित अथवा दान करण्यास नागरिकांनी सहकार्य केले
.महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने आणि रेस्क्यू टीम ह्यांनी ही नागरिकांना योग्य सूचना देत घाटावर स्वछता आणि सुरक्षा ठेवण्यास मोलाचे सहकार्य केले.पालिका आरोग्य विभागाने प्रशासन अधिकारी अमित पंडित आणि आरोग्य मुख्याधिकारी महादेव शिंदे, शंकर घाटे ह्यांच्या नेतृत्वाखाली योग्य समनव्यय ठेवत रोटरी वाल्हेकरवाडी सह निर्माल्य संकलन आणि त्याची वाहतूक व्यवस्था तसेच घाटाची स्वछता सातत्याने करण्यास अथक परिश्रम घेतले.
शिवाय डी वाय पाटील मधील राष्ट्रीय सेवा योजनांच्या 100 मुलांनी ही ह्या रोटरीच्या कार्यास हातभार लावत परिसरात स्वछता करण्यास प्राध्यापक शिवाजी माने ह्यांच्या मार्गदर्शन मध्ये कार्य केले
ह्या सर्व प्रयत्नांनी पवना नदी गणेशोत्सव दरम्याम स्वच्छ सुंदर राहण्यास सहकार्य झाले.राबवण्यात आला. यावेळी नागरिकांना जाहीर आवाहन करत नदी प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य नदीच्या पाण्यात टाकण्याऐवजी निर्माल्य कुंडात जमा करा.
प्लास्टिक कचरा वेगळा जमा करा तसेचगणपती मुर्ती विसर्जन हौदात विसर्जित करण्यास सहकार्य करण्यास आवाहन केले गेले आणि निर्माल्य वेगळे जमा करत पवना नदी स्वच्छ ठेवण्यात प्रयत्न करण्यात आले.सर्व भाविकांच्या सहकार्याने आज पवना नदी स्वच्छ सुंदर राहिली!!
रोटरीचे अध्यक्ष सुधीर मरळ ह्यांनी नागरिकांनी केलेल्या सहकार्य बद्दल धन्यवाद मानले आणि आपली पवना नदी स्वच्छ सुंदर करण्यास येत्या काळात सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.रोटरी वाल्हेकरवाडीच्या ह्या उपक्रमात रो. सुधीर मरळ, प्रदीप वाल्हेकर, तन्मय वाल्हेकर, निलेश सोनवणे, संदीप भालके, गणेश बोरा, रुपेश मुनोत, महेश जगताप, रेश्मा बोरा, वसंत ढवळे, रामेश्वर पवार, ज्योती भालके, गोविंद जगदाळे सर, सुभाष वाल्हेकर, अभिषेक वाल्हेकर, अतुल क्षीरसागर ह्या सर्व रोटरीयनी सहभाग नोंदवला.