ससून रुग्णालय ड्रग्ज रॅकेट प्रकरण,मुख्य आरोपी पाटील पलायण प्रकरणी नऊ पोलिस अधिकारी निलंबीत

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
– ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेटचा (Pune) म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याने 9 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मोठ्या गुन्हेगाराच्या बाबतीत बेजबाबदार आणि गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी PSI जनार्दन काळे, PC विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिव, PSI मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम काळे, शिपाई पिरप्पा बनसोडे, शिपाई आमित जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते
. ललित पाटीलचे मोठे (Pune) ड्रग्ज रॅकेटच उघडकीस आले असते मात्र तो पळून गेल्यामुळे मोठ्या कारवाईला मुकावे लागले. यामुळे 9 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे