मोदींनी आपल्या कार्यकाळात देशावरील कर्जाचा डोंगर वाढवला…

narendra-modi

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशावरील कर्ज वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्र सरकारवरील कर्जाचे प्रमाण गेल्या साडेचार वर्षात ४९ टक्क्याने वाढले आहे. भारतावर सप्टेंबर २०१८ अखेर ८२ हजार ३ लाख २५३ कोटी कर्ज असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारवर जून २०१४ मध्ये एकूण ५४ लाख ९० हजार ७६३ कोटी कर्ज होते. तर सप्टेंबर २०१८ मध्ये ८२ लाख ३ हजार २५३ कोटी कर्ज होते. कर्जाचे प्रमाण वाढत असताना वित्तीय तुटीला आळा घालण्याचेही केंद्र सरकारसमोर आव्हान आहे. एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत वित्तीय तूट ही ७.१७ लाख कोटी एवढी वित्तीय तूट झाली आहे. देशाच्या अर्थसंकल्पानुसार अर्थव्यवस्थेत ६.२४ लाख कोटींची जास्तीत जास्त वित्तीय तूट अपेक्षित होती.

Latest News