ललित पाटीलच्या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर, बोलणाऱ्यांची तोंडे बंद होणार- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – ललित पाटीलला अटक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यामांसमोर येत चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येणार असल्याचं सांगितलं. ललित पाटील याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याने पत्रकारांशी बोलताना दावा केला की, तो ससूनमधून पळाला नव्हता तर त्याला पळवण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालीय. दरम्यान ललित पाटीलच्या चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येणार आहे. बोलणाऱ्यांची तोंडे बंद होणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.

मुंबई पोलिसांच्या टीमने ड्रग माफिया  ललिल पाटीलला चेन्नई येथे बेड्या ठोकल्या. मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता. ललित पाटील सध्या साकीनाका पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे.

ललित पाटील प्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण जेव्हा समोर आल्या तेव्हापासून सुषमा अंधारे यांनी सरकार टीकेची झोड उठवलीय. ललित पाटीलवर मंत्री दादाजी भूसे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप अंधारे यांनी केला होता.

त्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले होते. सुषमा अंधारे यांच्या टीकेवर आज देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.“मुंबई पोलिसांनादेखील नाशिकमधील ड्रग्ज कारखान्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या कारखान्यावर धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी अशाप्रकारे जे कामे करतात त्यांच्यावर धाडी टाकल्या.

आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे. त्याच्या चौकशीतून निश्चितपणे मोठं नक्सेस बाहेर येईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.“काही गोष्टी मला आता ब्रीफ झाल्या आहेत त्या मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. मी योग्यवेळी तुम्हाला सर्व सांगेन. पण एवढेच सांगतो, एक मोठा नेक्सेस आम्ही यातून बाहेर काढणार आहोत

. ललित पाटीलनंतर तो काय बोलतो यापेक्षा जे काही नेक्सेस यातून बाहेर निघणार आहे, त्यातून सर्वांची तोंडं बंद होतील”,असा मोठा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय. त्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केलीय. गेल्या पंधरा दिवसांपासून फडवीस साहेब का बोलत नव्हते. फडणवीस साहेब का उत्तर देत नव्हते.कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ अठरा वाजले आहेत, तरीही उत्तर का मिळत नाहीत.

आम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे की काय ललित पाटीलचा ही जयसिंघानी होईल का. ज्याप्रकारे अनिल जयसिंघानी याला ताब्यात घेतलं आणि सर्व गोष्टी गुलदस्तात राहिल्या.त्याच या गोष्टीही गुलदस्तात राहतील का? ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयात ९ महिन्यांपासून उपचार घेत होता. त्याला ससूनमध्ये ठेवण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. ललित पाटील याला ससूनमधून पळवण्यासाठी कोणी गाड्या दिल्या? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.