लाच घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार ACB च्या जाळ्यात….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपळे सौदागर पोलीस चौकीमध्ये सहायक फौजदार जाधव यांनी तक्रारदार महिलेकडून पहिल्या टप्प्यातील 25 हजार रुपये लाच स्वीकारली. त्यावेळी त्यांना एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
सहायक फौजदार सुनील शहाजी जाधव (वय 49, नेमणूक सांगवी पोलीस ठाणे) असे रंगेहाथ पकडलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने एसीबीकडे तक्रार दिली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घराचे बांधकाम पिंपळे सौदागर येथे सुरु आहे. या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट बांधकाम व्यवसायिक कराळे यांना दिले होते. घराच्या बांधकामाबाबत कॉन्ट्रॅक्टर कराळे व तक्रारदार यांच्यात करार झाला होता.
तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी ( Sangvi ) महिलेकडून 25 हजारांची लाच घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. पोलीस चौकीमध्ये लाच घेताना त्याला पकडण्यात आले आहे
.करारानुसार बांधकाम व्यवसायिक यांनी काम वेळेत पूर्ण केले नाही व तक्रारदार यांचे ताब्यात असलेले कॉन्ट्रॅक्टरचे बांधकामाचे साहित्य कॉन्ट्रॅक्टर हे तक्रारदार यांच्याकडे मागत होते. परंतु बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांचे बांधकाम साहित्य देण्यात येईल असे तक्रारदार यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगितले.त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर कराळे यांनी तक्रारदार यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती
. या तक्रारी वरून तक्रारदार महिलेच्या विरुद्ध कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक फौजदार जाधव यांनी प्रथम 60 हजार रुपयाची लाच मागितली. त्यानंतर तडजोडी करून 50 हजारांची लाचेची मागणी केली.
तसेच ही लाच रक्कम दोन टप्प्यात देण्यास सांगितले.दरम्यान, तक्रारदार महिलेने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती