कुठल्याही घटनेला प्रतिक्रिया देऊ नका, तर प्रतिसाद द्या : मोटिव्हेशनल तज्ञ सोनू शर्मा यांचा तरुणांना सल्ला….


 
द ब्रदरहूड फाऊंडेशनच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

तरुणाईचा उत्साही प्रतिसादाने रंगले व्याख्यान 

तरुणांनी स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे : सोनू शर्मा

 पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- : आजच्या युवा पिढीकडे असंख्य क्षमता व संधी आहेत. फक्त त्यांनी थोडा धीर धरायला शिकले पाहिजे. सर्वांना सगळ्याची खूप घाई दिसते. त्यावर थोडे नियंत्रण आणले पाहिजे. तसेच तरुणांनी स्क्रीन टाईम कमी करण्याची आवश्यकता आहे. आपला काही वेळ त्यांनी कुटुंबियांसाठी, नातेवाईकांसाठी दिला पाहिजे आणि आपली कमिटमेंट पाळली पाहिजे.प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद क्षमता आहेत. पण आपण त्यांचा योग्य तितका, योग्य वेळी पुरेसा वापर करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक घटनेला आपण प्रतिक्रिया’ देतो. त्याऐवजी आपण प्रतिसाद द्यायला शिकले पाहिजे. मग यश आपल्यापासून दूर नाही, असा मंत्र प्रख्यात मोटिव्हेशनल तज्ञ सोनू शर्मा यांनी उपस्थितांना दिला. संवादी शैली, हलक्याफुलक्या विनोदाचा शिडकावा, सादरीकरणातील नाट्यमयता, विषयाचे नेमके भान आणि जाण अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे शर्मा यांचे कथन गर्दीने ओसंडून गेलेल्या सभागृहात विलक्षण परिणामकारक ठरले.
 
निमित्त होते, सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या द ब्रदरहूड फाऊंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सोनू शर्मा यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बंतारा भवन, बाणेर येथे करण्यात आले होते. द फाउंडेशनचे अध्यक्ष पवनकुमार जैन, संस्थापक जयप्रकाश गोयल, ईश्‍वरचंद गोयल, सचिव रविकिरण अग्रवाल,  सहसचिव नरेंद्र गोयल, कोषाध्यक्ष संजय अग्रवाल, समन्वयक कर्नल नरेश गोयल, मुकेश कनोडिया, संजय अग्रवाल तसेच पुणे जिल्ह्यातील विविध क्लब व संघटनांचे पदाधिकारी तसेच मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील सर्व अग्रवाल समाजाच्या क्लब व संधटनांना एकत्रित आणणे व अग्रवाल समाजाला एका माळेत जोडण्याच्या उद्देशाने या मार्गदर्शन सम्मेलनाचे आयोजन केले गेले होते.

 सोनू शर्मा यांनी व्याख्यानाच्या सुरवातीलाच स्वत:च्या लौकिकार्थाने अपयशी कारकिर्दीची माहिती देत, उपस्थितांना आपलेसे केले. ‘आपल्याविषयी कुणी काहीही मत मांडले, तरी ते आपले वास्तव रूप असू शकत नाही,’ याची खूणगाठ स्वत:शी बांधा. फक्त अनुभव तुम्हाला यशापर्यंत नेत नाही. व्यवहारातला त्याचा नेमका वापर, तुम्हाला यशापर्यंत नेऊ शकतो. ‘ज्ञान ही शक्ती आहे’, असे म्हणताना, ते ज्ञान तुमच्या बँकखात्यात प्रत्यक्ष दिसले पाहिजे, अन्यथा ते नुसते एक वाक्य ठरते, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. ज्ञानाची अंमलबजावणी केली, तरच ती शक्ती ठरते. प्रत्येक व्यक्तीपाशी यशाच्या अनेक शक्यता असतात. क्षमता असतात. गरज असते ती त्या क्षमतांच्या विकासाच्या प्रक्रियेची. प्रक्रियेमुळे यशाची खात्री निर्माण करता येते. मात्र, प्रक्रिया सुरवातीला कष्टप्रद असते. ती प्रतीक्षा करायला लावते. पण त्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर अपेक्षित यशप्राप्ती खात्रीने मिळते. आपली सहनशक्ती, परिश्रमातील सातत्य ढळू देऊ नका, असे शर्मा म्हणाले.

बदल स्वीकारा : संधी मिळतील कोणत्याही क्षेत्रात काळानुरूप होणारे बदल सकारात्मक पद्धतीने आपलेसे करा, त्यांचा स्वीकार करा, तेच तुम्हाला नव्या यशाच्या अनेक संधी मिळवून देतील. जे बदलांना सामोरे जात नाहीत, ते स्पर्धेतूनच काय व्यवसायातून बाहेर फेकले जातात, हे विधान सोनू शर्मा यांनी जगभरातील अनेक ताजी उदाहरणे देत पटवून दिले. तुमच्या क्षेत्रात पुढच्या 10 ते 25 वर्षांच्या काळात काय घडू शकते, याचा विचार आधी करा. भविष्यवेधी राहिलात तर पुढच्या बदलांची चाहूल आधी लागून, अनुरूप बदल त्वरित करू शकाल. कारण कोणतीही बाजारपेठ सतत नवे, वेगळे, आकर्षक काही शोधत असते. त्या नवेपणाला प्रतिसाद द्या, यश तुमचेच आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.
मन सामर्थ्यशाली, शरीर मनाचे ऐकते : आपले मन अतिशय सामर्थ्यशाली आहे. मनात जे सातत्याने सुरू असते, आपले शरीर, कृती त्यानुरूप घडतात किंवा बिघडतात. त्यामुळे मन कणखर, धाडसी करा. आपल्या चुका सतत उगाळत बसू नका. पुढचा विचार करा. आपल्या यशाकडे जाताना ‘देणारे’ व्हा, ‘घेणारे बनू नका’, असा सल्ला शर्मा यांनी दिला.
स्क्रीन टाईम कमी करा : तरुणाईसाठी संदेश देताना सोनू शर्मा म्हणाले,‘आजच्या युवा पिढीकडे असंख्य क्षमता आहेत. संधी आहेत. फक्त त्यांनी थोडा धीर धरायला शिकले पाहिजे. सगळ्यांना सगळ्याची खूप घाई दिसते. त्यावर थोडे नियंत्रण आणले पाहिजे. तसेच तरुणांनी स्क्रीन टाईम कमी करण्याची आवश्यकता आहे. आपला काही वेळ त्यांनी कुटुंबियांसाठी, नातेवाईकांसाठी दिला पाहिजे आणि आपली कमिटमेंट पाळली पाहिजे. कोविडकाळ एका वेगळ्या अर्थाने लाभदायक ठरला कारण जे तंत्रज्ञान येण्यासाठी किमान 15 वर्षे लागली असती, ते कोविडमुळे त्वरित प्रत्यक्षात आले.
———- किसी भी घटना पर ’रिएक्ट’ न करें, ’रिस्पॉन्स’ दें: मोटिवेशनल एक्सपर्ट सोनू शर्मा की युवाओं को सलाह

द ब्रदरहुड फाउंडेशन के रोप्यामहोत्सव वर्ष के अवसर पर एक विशेष मार्गदर्शन  शिविर का आयोजन 

युवाओं को स्क्रीन टाइम कम करना चाहिए: सोनू शर्मा

 पुणे: आज की युवा पीढ़ी पास काफी क्षमता व अवसर हैं. उन्हें बस धैर्य रखना सीखना होगा। हर कोई जल्दी में लग रहा है. इसे कुछ हद तक नियंत्रण में लाया जाना चाहिए. साथ ही युवाओं को स्क्रीन टाइम भी कम करने की जरूरत है. उन्हें अपना कुछ समय परिवार, रिश्तेदारों को देना चाहिए और अपनी प्रतिबद्धताएं निभानी चाहिए्। हर व्यक्ति में असीमित क्षमता होती है। लेकिन यह सच है कि हम इनका सही समय पर पर्याप्त उपयोग नहीं करते ह््ैं। हम हर घटना पर प्रतिक्रिया देते हैं. इसके बजाय हमें जवाब देना सीखना चाहिए्, ऐसा सफलता का मंत्र मोटिवेशनल एक्सपर्ट सोनू शर्मा ने दिया.  

सामाजिक कार्यों में अग्रणी द ब्रदरहुड फाउंडेशन के रजत जयंती वर्ष के अवसर पर बंटारा भवन, बाणेर में सोनू शर्मा के मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया। इस अवसर पर फाउंडेशन के अध्यक्ष पवनकुमार जैन, संस्थापक जयप्रकाश गोयल, ईश्‍वरचंद गोयल,  सचिव रविकिरण अग्रवाल, सहसचिव नरेंद्र गोयल, कोषाध्यक्ष संजय अग्रवाल,  समन्वयक कर्नल नरेश गोयल, मुकेश कनोडिया, संजय अग्रवाल के साथ-साथ पुणे जिले के विभिन्न क्लबों और संगठनों के पदाधिकारी और गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। पुणे जिले में अग्रवाल समुदाय के सभी क्लबों और संगठनों को एक साथ लाने और अग्रवाल समुदाय को एक परिवार में एकजुट करने के उद्देश्श से इस अभिविन्यास सम्मेलन का आयोजन किया गया था।  

व्याख्यान के आरंभ में सोनू शर्मा ने अपने प्रसिद्ध असफल कैरियर के बारे में जानकारी देकर श्रोताओं को अपना अपना बना लिया। चाहे कोई भी आपके बारे में कुछ भी सोचे, वह आपका असली रूप नहीं हो सकता। केवल अनुभव ही आपको सफलता की ओर नहीं ले जाता। व्यवहार में इसका सही प्रयोग आपको सफलता की ओर ले जा सकता है। शर्मा ने कहा, ज्ञान ही शक्ति है,  ज्ञान आपके बैंक खाते में दिखना चाहिए, अन्यथा यह सिर्फ एक मुहावरा बन कर रह जाएगा। क्रियान्वयन से ही ज्ञान शक्ति बडती है। प्रत्येक व्यक्ति में सफलता की अनेक सम्भावनाएँ और क्षमताएं हैं. आवश्यकता उन क्षमताओं को विकसित करने की प्रक्रिया की है। प्रक्रिया सफलता सुनिश्‍चित करती है। हालाँकि, शुरुआत में यह प्रक्रिया कठिन है। वह उसे इंतजार करवाती है. लेकिन इससे बाहर निकलने के बाद अपेक्षित सफलता निश्‍चित है। अपनी सहनशक्ति, कड़ी मेहनत में निरंतर रखे ।

परिवर्तन को अपनाएं: किसी भी क्षेत्र में जहां अवसर पैदा होते हैं, समय के साथ परिवर्तनों को सकारात्मक रूप से अपनाएं और अपनाएं, वे आपके लिए सफलता के कई नए अवसर लाएंगे। जो लोग परिवर्तनों का सामना नहीं करते, उन्हें प्रतिस्पर्धा द्वारा व्यवसाय से बाहर कर दिया जाता है, सोनू शर्मा ने दुनिया भर के कई ताजा उदाहरण दिए्। पहले यह सोचें कि अगले 10 से 25 वर्षों में आपके क्षेत्र में क्या हो सकता है। यदि आप पूर्वानुमानित हैं, तो आप अगले परिवर्तनों का अनुमान लगा सकेंगे और तुरंत तदनुरूप परिवर्तन कर सकेंगे। क्योंकि कोई भी बाज़ार लगातार कुछ नया, अलग, आकर्षक तलाश रहा है। उस नवाचार का जवाब दें, सफलता आपकी है, शर्मा ने यह भी कहा।

मन शक्तिशाली है, शरीर मन की बात सुनता है : हमारा मन बहुत शक्तिशाली है। हमारा मन जो सोचता है, उस प्रकार अपना  शरीर कृती करता है, उसी के अनुसार कार्य होते या बिगड़ते ह््ैं। इसलिए मजबूत और बहादुर बनो। अपनी गलतियों पर ध्यान मत दो. आगे की सोचो। शर्मा ने सलाह दी, काम देने वाले बनो, लेने वाले मत बनो।

स्क्रीन टाइम कम करें: युवाओं को संदेश देते हुए सोनू शर्मा ने कहा, आज की युवा पीढ़ी के पास क्षमता व अवसर हैं. उन्हें बस धैर्य रखना सीखना होगा। हर कोई जल्दी में लग रहा है. इसे कुछ हद तक नियंत्रण में लाया जाना चाहिए.’ साथ ही युवाओं को स्क्रीन टाइम भी कम करने की जरूरत है. उन्हें अपना कुछ समय परिवार, रिश्तेदारों को देना चाहिए और अपनी प्रतिबद्धताएं निभानी चाहिए्। कोविड काल एक अलग मायने में फायदेमंद रहा क्योंकि जिन तकनीकों को आने में कम से कम 15 साल लगे होंगे, वे कोविड के कारण तुरंत वास्तविकता बन गई्ं।

Latest News