‘आंतर-भारती’ दिवाळी अंकाचे ​ ४ नोव्हेंबर रोजी प्रकाशन,,, मान्यवरांच्या व्याख्यानातून संविधानाचा जागर

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

ज्येष्ठ कादंबरीकार आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ​डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी संपादित केलेल्या ‘आंतरभारती’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन ​संगणकतज्ज्ञ,लेखक अच्युत गोडबोले,संविधान अभ्यासक प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते ४ ​नोव्हेबर रोजी सायंकाळी पाच वाजता​ महाराष्ट्र साहित्य परिषद(सदाशिव पेठ) येथे होणार आहे.​आंतरभारती ट्रस्ट चे अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.​डॉ.लक्ष्मीकांत देशमुख​ यांचीही विशेष उपस्थिती कार्यक्रमाला असणार आहे.

आंतरभारती चे राष्ट्रीय सचिव डॉ​.डी​.एस​.कोरे,पुणे शाखेच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

यंदाचा ​​आंतरभारती ​दिवाळी अंक हा ​​’​​मूलभूत अधिकार,कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे विशेषांक​’​आहे.त्यामुळे ‘ या संवैधानिक मूल्य त्रयींवर ​अच्युत गोडबोले,प्रा.गौतमीपुत्र कांबळे​,डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांची व्याख्याने या कार्यक्रमात होणार आहेत.

प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक

‘आंतर-भारती’ या दिवाळी अंकाचे हे ​पाचवे वर्ष आहे .आंतरभारती ही पूज्य साने गुरुजींच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय एकात्मता , भारताची बहू धार्मिकता , बहू सांस्कृतिकता , बहू भाषिकता , बंधुता व सहिष्णुता जोपासण्यासाठी आणि प्रबोधनासाठी गेली पन्नास वर्षे काम करणारी स्वायत्त संस्था आहे . प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक ही आंतरभारती दिवाळी अंकाची आता सर्वमान्य व सर्वज्ञात ओळख बनली आहे .
​’मागील ७५ वर्षांत भारतीय नागरिकां​मध्ये संविधानातील ‘​​मूलभूत अधिकार,कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे’ याविषयी किती जागरूकता निर्माण झाली , या साऱ्या प्रश्नांचा वेध घेणारे ​,तत्त्वज्ञान , संकल्पना आणि संविधानिक महत्त्व उलगडून टाकणारे वैचारिक लेख ,मुलाखती व परिसंवाद यांनी हा अंक संपन्न आहे . वाचकांना नवे मूल्यभान देणारा हा अंक आहे​’,असे डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले. ​न्या ए पी शाह,यशवंत मनोहर,डॉ नितीश नवसागरे,डॉ अशोक चौसाळकर,डॉ डी एस कोरे,डॉ चैत्रा रेडकर,प्रकाश पवार,सुभाष वारे,डॉ शमसुद्दीन तांबोळी,डॉ हमीद दाभोलकर,अंजली कुलकर्णी,शरद जावडेकर,विजय चोरमारे,प्रा.अविनाश कोल्हे,कलीम अजीम आदी मान्यवरांनी या अंकासाठी लेखन केले आहे

Latest News