केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला जल्लोषात सुरुवात

पुणे : पुण्यातील पी.एम.श्री. केंद्रीय विद्यालय बीईजी अँड सेंटरच्या वतीने 2 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान 52 वी केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा रोप स्किपिंग (मुली) 2023-24 चे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पुणे विद्यापीठात करण्यात आले. या कार्यक्रमाला खडकी येथील दारुगोळा कारखान्याचे सरव्यवस्थापक तथा अध्यक्ष संजय हजारी, तसेच ए.एफ.खडकी येथील अतिरिक्त महाव्यवस्थापक डॉ. श्री.के.के.मौर्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संगीतमय स्वागत गीताने झाली, त्यानंतर पी.एम.श्री के. वि.बी.ई.जी.अँड सेंटरच्या प्राचार्या उमा एस चंद्रा यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी केंद्रीय विद्यालय संघटनेतील खेळ आणि खिलाडूवृत्तीला चालना देणारा सांस्कृतिक वारसा अधोरेखित केला

. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिताना संबोधित करताना विविधतेतील एकतेचे महत्त्व सांगितले. तसेच केंद्रीय विद्यालय संघटनेने साकारलेली दृष्टी सांगून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पी.एम.श्री के. वि.बीईजी अँड सेंटर खडकीच्या प्राचार्या उमा एस.चंद्रा यांच्या हस्ते नागपूर येथील के.वि.आयएनएस हमला यांचे परीक्षक प्राचार्या स्वाती काळे यांचे स्वागत करण्यात आले.

एस.के.कैवर्त यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले. यावेळी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मान्यवरांच्या हस्ते मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Latest News