नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आदींसाठी परवानगी नाही :पुणे विद्यापीठ

Savitribai-Phule-Pune20University

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात सभासद नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आदी उपक्रम घ्यायचे असल्यास, विद्यापीठाच्या प्रशासनाची आणि पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.परवानगी न घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
याबाबतचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकाचा फटका आता विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थी संघटना, विविध शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक संस्थांना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीचे आक्षेपार्ह लिखाण, विद्यार्थी संघटनांमधील ( Pune) हाणामारी आणि वेळोवेळी विद्यापीठाच्या संकुलात होणारा राजकीय आखाडा लक्षात घेता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सभासद नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आदींसाठी परवानगी मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे.

तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता, विद्यापीठाच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.पूर्वपरवानगीशिवाय अशा पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांवर ( Pune) कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. पवार यांनी जाहीर केले

विद्यापीठामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी आणि नोंदणी करुनच, प्रवेश दिला जात आहे.त्याचप्रमाणे वसतिगृहात केवळ रहिवासी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या दोन्हींचा फटका हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांनाच बसणार असून, अनेक शैक्षणिक उपक्रमांना विद्यार्थ्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे

Latest News