नारायणा स्कॉलिस्टीक शिष्यवृत्ती उच्च शिक्षणासाठी उपयुक्त – शंकरसिंह राठोड


‘एनसॅट -२३’ ॲप्टिट्यूड टेस्ट १३ विद्यार्थी शंभर टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे (दि. ०६ नोव्हेंबर २०२३)देशातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट च्या वतीने ‘एनसॅट -२३’ या ॲप्टिट्यूड टेस्टचा निकाल दोन नोव्हेंबरला जाहीर झाला. या परीक्षेत पिंपरी चिंचवड शहरातील १३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. आयआयटी, जेईई, नीट, मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती उपयुक्त आहे. या शिष्यवृत्ती मुळे पालकांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन स्वप्न साकार करता येईल, असे मत नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या पिंपरी चिंचवड शाखेचे संचालक शंकर सिंह राठोड यांनी व्यक्त केले.
नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट च्या वतीने ‘एनसॅट २३’ परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक संजय कुमार, शैक्षणिक विभाग प्रमुख परिणीता सुधांशू, प्रा. भगवान पटेल आदी उपस्थित होते.
नारायणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट १९७९ पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. भारतातील २३ राज्यांमध्ये संस्थेच्या ६५० पेक्षा अधिक शाखा आहेत. समाजातील विविध घटकांमधील विद्यार्थ्यांना ‘एनसॅट – २०२३’ परीक्षेत सहभागी होता यावे हा उद्देश समोर ठेवून नारायणा इन्स्टिट्यूटने ही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे घेतली. देशभरातून सुमारे अडीच लाख तर पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून साडेचार हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून १३ विद्यार्थी शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. ‘एनसॅट २३’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फी सवलती व्दारे एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, असे शंकर सिंह राठोड यांनी सांगितले.