”कुणबी” नोंदी असलेल्या 12 हजार 294 व्यक्तींना प्रमाणपत्राचे वितरण: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
जिल्ह्यात मागील दहा महिन्यांत कुणबी नोंदी असलेल्या 12 हजार 294 व्यक्तींना प्रमाणपत्राचे (PMC) वितरण करण्यात आले आहे. एकूण प्राप्त 12 हजार 911 अर्जांपैकी 460 अर्ज प्रलंबित असून 157 अर्ज नाकारण्यात आले आहेत. तालुका स्तरावर यासंदर्भातील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच महानगरपालिका, सहकार विभाग, पुरातत्व विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी .राजेश देशमुख म्हणाले की, कुणबी नोंदी घेण्यासाठी तालुकास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून याबाबतच्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेण्यात यावा. झालेल्या कार्यवाहीचा अहवाल दर आठवड्यात न्या. शिंदे समितीला पाठविण्यात येणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्याने अनुसरलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी व त्याच पद्धतीने विविध विवरणपत्रात अहवाल सादर करावा. बहुतेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनालयाकडून प्रशिक्षित व्यक्तींचे सहकार्य घेण्यात यावे, प्रमाणपत्र देताना अशा व्यक्तीचे प्रमाणपत्र लक्षात घेतले जाते.13 प्रकारच्या विविध कागदपत्रांच्या आधारे ही तपासणी करावयाची आहे.
संबंधित विभागांनी या कामासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी. मागासवर्गीय आयोगाकडून माहिती मागविल्यास तातडीने उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियंत्रण कक्षात संबंधित विभागांनी आपला एक अधिकारी तालुक्याशी समन्वय करण्यासाठी नियुक्त करावा, असे निर्देश ही त्यांनी दिले.