पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील तलाठी व त्याच्या साथीदारा लाचलुचपत विभागाच्या पथकाने 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना अटक…

lach-courption

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,.तक्रारदार शेतकरी आहेत. (Pune)तक्रारदाराला त्यांच्या आजोबांनी बक्षीसपत्राने 39 गुंठे जमीन दिली होती. ती जमीन सात-बारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठ्याकडे अर्ज केला होता. या कामासाठी आरोपी निलेश गद्रे याने तक्रारदाराला 5 हजार रुपयांची लाच मागितली.ती लाच स्विकारण्यासाठी निलेश गद्रे व त्याचा साथीदार आदित्य कुंभारकर हे दिवे येथे आले. ही लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगे हात पकडले. सासवड पोलीस ठाण्यात याप्रकऱणी गुन्हा दाखल केला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर याचा पुढील तपास करत आहेत.पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना पुरंदर तालुक्यातील( Pune)सोनोरी येथील तलाठी व त्याच्या साथीदारा लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी (दि.7) पुरंदर तालुक्यातील दिवे गाव येथे केली.निलेश सुभाष गद्रे (वय 42) असे अटक तलाठ्याचे नाव असून त्याच्यासह खासगी इसम आदित्य मधुकर कुंभारकर (वय 21 रा. वजपुरी, पुरंदर) यालाही अटक केली असून दोघां विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Latest News