दिवाळी पहाट कार्यक्रमास चांगला प्रतिसाद!

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे ः ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. ‘मल्हार ऍकेडमी ऑफ म्युझिक’ च्या वतीने या वेळी ‘आवाज चांदण्यांचे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्ष लीना मेहेंदळे , विवेक वेलणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.किरण भिडे, श्रुती देवस्थळी, पूर्वा जठार, अर्चना पंतसचिव, चिन्मयी तांबे यांनी बहारदार गीते सादर केली. प्रसन्न बाम, यश भंडारे, राजेंद्र हसबनीस, विशाल गंद्रटवार यांनी साथसंगत केली.अपर्णा संत यांनी सूत्रसंचालन केले.

‘लख लख चंदेरी सोनेरी,सुरमई शाम, सांज ये गोकुळी, वो चांद खिला, वो तारे हसे, चांदण्यात फिरताना’,अशी अनेक सुरेल गीते सादर करण्यात आली, त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. हा कार्यक्रम गुरूवार, ९ नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी साडे सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८९ वा कार्यक्रम होता.