वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

-वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ( PCMC) पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच संबंधितांना पर्यावरण संरक्षण कायदा 1986, वायू (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा 1981 नुसार नोटीस देखील बजावण्यात येत आहे

शनिवारी (दि. 11) 60 पेक्षा अधिक जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने शहरात वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांकडून हद्दीतील ठिकाणांची पाहणी केली जाते. तिथे पालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होते का याची खातरजमा केली जाते. मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत असल्यास दंडात्मक कारवाई तसेच नोटीस दिली जात आहे.

शनिवारी अ प्रभागात पथकाने आठ ठिकाणी भेट देऊन तीन जणांना नोटीस बजावली आहे. यात 22 हजार 100 रुपये वायू प्रदूषण आणि 5 हजार रुपये कचरा केल्या प्रकरणी वसूल करण्यात आले.

ब प्रभागात 22 ठिकाणी भेट देत 10 नोटीसा देत 28 हजारांचा दंड वसूल केला आहे. क प्रभागात 18 ठिकाणी भेट देऊन 8 ठिकाणी नोटीस देण्यात आली आहे. टर 31 हजारांचा दंड वसूल केला आहे

.ड प्रभागात 14 ठिकाणी भेट दिली असून 9 ठिकाणी नोटीस आणि एक लाख 35 हजार रुपये दंड वसूल केला आहे. इ प्रभागात 17 नोटीसा देत 58 हजार 318 रुपये दंड आकारला आहे

. फ प्रभागात 12 ठिकाणांची पथकाने पाहणी केली.त्यात एकास नोटीस देत आठ ठिकाणी कारवाई करत 37 हजारांचा दंड वसूल करण्यात आला

. ग प्रभागात 22 ठिकाणांची पाहणी करत 14 जणांना नोटीसा आणि पाच ठिकाणी दंडात्मक कारवाई करत 17 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

ह प्रभागात 27 हजार रुपये दंड वसूल केला ( PCMC) आहे.