मागासवर्गीय आयोगाला पैसे दिल्याशिवाय आयोग चालणार कसा – छत्रपती संभाजीराजे


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
सरकारने ताबडतोब सगळ्या सेवासुविधा आयोगाला देऊन मदत करावी. त्याशिवाय काहीच होणार नाही. आयोगाला अनेक प्रश्न दिले आहेत. कुणबी मराठा आरक्षण देता येतं का? याच्यात काय काय आहे? असे अनेक प्रश्न दिले आहेत. मराठा कुणबी एकच आहे, त्यामुळे सरसकट आरक्षण देता येतं का? असं विचारलं आहे, अशी माहिती संभाजीराजे
राज्य मागासवर्गीय ऑफीस हजार स्क्वेर फिट पण नाही, सरकारला विनंती आहे की मागासवर्गीय आयोगाला पैसे दिल्याशिवाय आयोग चालणार नाही, असंही ते म्हणाले महाराष्ट्रात आज वेगळी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे. दहा बारा समाजाचे प्रश्न आयोगासमोर मांडले.
त्यांनी बाजू ऐकून घेतल्या. सकारात्मकतेने विषय ऐकले गेले असं ते म्हणाले.विषय जितका सोपा दिसतो तितका सोपा नाही.
आम्हाला अभ्यास करावा लागेल,आजपासून काम सुरू करणार असं आयोगाने सागितले,
. राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक आज पुण्यात पार पडत आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी आयोगाची भेट घेतली. त्यांनी आयोगासमोर काही प्रश्न मांडले आहेत. आयोगासोबतच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला.
समाजातील लोकांवर अन्याय होत आहे. काही विषय मांडण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो, असं ते म्हणाले.महाराष्ट्रात जी काही चर्चा सुरु आहे. मराठा समाजाला आरक्षण कशाप्रकारे मिळू शकते? सुप्रीम कोर्टाचे रुलिंग असे काही विषय त्यांच्यासमोर मांडले. त्यांच्याशी चर्चा केली. राज्य मागासवर्ग हा स्वतंत्र आयोग आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचं बंधन नाही. त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली. पण, त्यांनी काही उत्तरे दिली नाहीत, असं ते म्हणाले