पुण्याच्या येरवडा तुरुंगातुन कुख्यात गुंड आशिष जाधव फरार….


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
एका खुनाच्या आरोपाखाली पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव हा पळून गेला आहे. पोलिसांना चकवा देऊन तो तुरुंगातून पळून गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. यामुळं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हा उपस्थित केलं जात आहे.
आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात होता. जाधवला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं.
या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय आहे. काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली. त्यावेळेस अशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही.
त्यामुळं जाधव हा फरार झाल्याचं लक्षात आलं. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा करागृहातूनच तो पळाल्याने खळबळं उडाली आहे.