धनगर आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करा…

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) अहमदनगरचे नाव बदलून त्वरीत पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर करावे, आरक्षणासाठी 50 दिवसांचा अवधी मागितला होता त्यावरही त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी या निवेदनातून धनगर समाजाने मुख्यमंत्र्यांकडे केली

पिंपरी चिंचवड शहरातील धनगर समाज बांधवांच्यावतीने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निगडी तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले.यावेळी उपस्थित राजू दुर्गे, गणेश खरात, निखिल पडळकर, रणजित हप्ते, मारुती खडके, संतोष रुपनवर, सागर थोरात, तुकाराम घुंडरे, दिगंबर घुंडरे, राहुल मदने, केशव मदने, दिपक भोजने आदी सर्वजण उपस्थित होते.दिलेल्या निवेदनात मुख्य आठ मागण्या मांडण्यात आल्या आहेत

– जे आदिवासी ना ते धनगरांना या प्रमाणे घोषीत केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या 22 योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याबाब आढावा घ्यावा,

मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर स्वतंत्र कायदा आणून त्यांना संरक्षण देणे सतेच महसूल रेकॉर्ड मधील आरक्षित चराई कुरणे क्षेत्र वार्षिक प्रती हेक्टर एक रुपया दर आकारणी करून स्थानिक मेढपाळांना वाटप करावे.बिरोबा मंदिर देवस्थानाच्या आरेवाडी, हुलजंती,हुन्नुर पट्टणकोडोली,वाशी या मुळ देवस्थानांच्या सर्वांगीण विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे, महाराज यशवंत होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफगावचा विकास आराखडा त्वरीत तयार करून त्याला मान्यता द्यावी,

. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा, आहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र यांच्या वतीने धनगर आरक्षणाकरीता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत ॲड. कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करणे , तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता अर्ज दाखल करा, मेंढपाळांसाठी घोषीत केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वयीत करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षाची नेमणूक करा, अशी मागणी करण्यात आली आहें

Latest News