पुणे महापालिकेचे माजी आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारतीवर गुन्हा

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) मुंबई महानगरपालिकेनंतर आता पुणे महापालिकेतही कोविड घोटाळा झाल्याची बातमी समोर येत आहे. पुणे महापालिकेचे माजी आरोग्य प्रमुख डॅाक्टर आशिष भारती यांच्यावर कोविड काळात घोटाळा केल्याचा आरोप आहे

.याप्रकरणी महापालिकेचे माजी आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण सूर्यकांत तरडे, डॉ. सूर्यकांत हनुमंत गाडिया यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे आरोप 2021 मध्ये कोविड-19 कालावधीत 80 ते 90 लाख रुपयांच्या घोटाळ्यात त्यांच्या कथित सहभागाशी संबंधित आहेत. या घोटाळ्याचा केंद्रबिंदू वारजे येथील अरविंद बारटक्के क्लिनिक होता, असं सांगितलं जात आहे. हा घोटाळा नुकताच उघडकीस आता आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष भारती मनपाचे आरोग्य प्रमुख होते, त्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी लागणाऱ्या कोविड टेस्ट शासनाकडून आलेल्या सर्व आरोग्याच्या वस्तू खोट्या नोंदी करून या खासगी रुग्णालयात विकल्या जात होत्या.

आशिष भारती यांनी नागरिकांसाठी आलेले सरकारी औषधे पीपीई किट कोरोना टेस्टिंगचे साहित्य हे नागरिकांना न देता कागदोपत्री नागरिकांना दिल्याचे दाखवत खासगी रुग्णालयात विकत होते, असा आरोप आहे

या घोटाळा प्रकरणी डा. आशिष भारतीय ,डॉ.अरुणा सूर्यकांत तारडे डा. ऋषिकेश हनुमंत गार्डी या तीन या तिघाजणासह इतरांवर वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून ही यात मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

Latest News