– महापालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा- नागरिक आणि अधिकारी,कर्मचा-यांनी केले सामुहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन

भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार करत आपल्या देशाप्रती एकनिष्ठ राहून देशाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्याचा सामुहिक संकल्प पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करताना केला.

      भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे हस्ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले त्यावेळी उपस्थितांनी संविधान अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करीत असल्याची कृतज्ञ भावना व्यक्त करून संविधान दिन उत्साहात साजरा केला.

      यावेळी उप आयुक्त मनोज लोणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उप अभियंता चंद्रकांत कुंभार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच माजी नगरसदस्य मारूती भापकर, सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले,अजिज शेख, नितीन घोलप, सुनिल भिसे, शाहजी नायर, नारायण म्हस्के, व्ही. व्ही. शिंदे, शालनबाई ओव्हाड, तुकाराम गायकवाड, श्रीकांत आपटे आदी उपस्थित होते.

     त्यानंतर पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच या पुतळ्याच्या प्रांगणातील भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेच्या भव्य प्रतिमेस देखील पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त  जगताप यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रबोधन पर्व कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले आणि संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धा परिक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही त्यांच्या हस्ते करण्यात आला.

      या कार्यक्रमास माजी नगरसदस्य मारूती भापकर, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.रामराजे भोसले, ॲड. गोरक्ष लोखंडे, ॲड दिनकर बारणे, ॲड सचिन थोपटे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब कसबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, धुराजी शिंदे, युवराज दाखले, अझहर खान, नितीन घोलप, सुनील भिसे, अरुण मैराळे, कांचन जावळे, गिरीश वाघमारे, धम्मराज साळवे, अमित कांबळे, उत्तम कांबळे, रमेश चिमुरकर तसेच नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन व संविधान प्रास्ताविकेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार काजल कोथळीकर यांनी मानले.

Latest News