राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी- सुप्रिया सुळे


पुणे(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) राज्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात सापडला आहे. सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे
.पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी राज्य महायुती सरकारवर केली आहे
, महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे अतिशय अडचणीत सापडला आहे. अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन उभा करायला हवे. परंतु सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची कसलीही काळजी नाही असे स्पष्ट दिसते.
पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहेजेव्हा या सरकारमधील नेत्यांची वैयक्तिक कामे असतात तेव्हा विनाविलंब ते दिल्लीला पळतात. मग शेतकऱ्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे.
महाराष्ट्र सरकारने दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत आणली पाहिजे व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.