महापालिकेच्या वतीने 40 महिला बचतगटांच्या स्पर्धेचे आयोजन, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी योग्य ते सहकार्य- आयुक्त शेखर सिंह

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
नवी दिशा उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छ्ता स्पर्धेत भाग घेतलेल्या 40 महिला बचतगटांच्या स्पर्धेचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम निकाल तसेच विजयी बचत गटांचा बक्षीस वितरण समारंभ चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उप आयुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, अंकुश जाधव, राजेश आगळे, सीताराम बहुरे, उमेश ढाकणे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे , जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.नवी दिशा उपक्रमातंर्गत घेण्यात (Pimpri) आलेल्या सार्वजनिक स्वच्छचा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बचतगटांच्या योगदानाबद्दल शहराला अभिमान वाटत असून त्यांच्या सहभागातून यशस्वी करण्यात आलेल्या या उपक्रमाची दखल पुर्ण देशातच नव्हे तर जगात घेतली जात आहे.
महापालिकेच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले तसेच स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करून सर्वांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या.स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावलेल्या नवी दिशा महिला मंडळाने लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी अनुकूल असलेली (Pimpri) शौचालयाची जागा, कचऱ्यापासून सुशोभिकरण, वीजेची बचत व्हावी यासाठी गती संवेदकांचा वापर, प्लास्टिकच्या पोस्टर्सच्या ऐवजी कापडी पोस्टर्सचा वापर, 24 तास सीसीटीव्ह अशा अनेक सुविधा नागरिकांना पुरविल्या आहेत.
दुसरा क्रमांक प्रेरणा महिला बचत गटाने पटकावला. या बचत गटाने सार्वजनिक शौचालयांमध्ये सौरउर्जेचा वापर करण्यासाठी सोलार पॅनल्स बसविले असून कचऱ्यापासून सुशोभिकरण केले आहे. तसेच शौचालयाच्या भोवतीने वृक्षांची लागवड करून जगजागृतीपर संदेशसही लिहीले आहेत.या स्पर्धेत विदिशा महिला बचत गटाने तिसरा क्रमांक पटकावला. या बचत गटाने सार्वजनिक शौचालयांमध्ये सौरऊर्जा तसेच पावर बॅकअप इन्हवर्टर अशा अत्याधुनिक सुविधांचा वापर केला आहे.
स्पर्धेत स्व्छ सार्वजनिक शौचालये, माहितीदर्शक योग्य चिन्हांचा वापर, शौचालयाच्या बाजूस सुशोभिकरण, सॅनिटरी वेंडिंग मशिन्स आणि इन्सिनरेटर्सची सुयोग्य सुविधा पाहून काही बचत गटांना उत्तेजनार्थ बक्षिसही देण्यात आले. या महिला बचत गटांमध्ये अ प्रभागातील ऐश्वर्या महिला बचत गट, महर्षी महिला बचत गट, ग प्रभागातील भरारी महिला बचत गट यांचा समावेश होता. यावेळी उत्कृष्ट सामाजिक समन्वयक म्हणून समूहसंघटक वैशाली लगडे आणि वैशाली खरात यांचाही आयुक्त शेखर सिंह यांच्या सन्मान करण्यात आला.