किर्तन महोत्सव हा स्तुत्य उपक्रम – विवेक वेलणकर

पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित
‘कथा कीर्तन महोत्सव’ मध्ये पाचव्या दिवशी, शुक्रवार , दि. १ डिसेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता कीर्तनकार श्रेयस बडवे व सौ.मानसी बडवे पती -पत्नीच्या कीर्तन जुगलबंदीने प्रेक्षकांना भारावून टाकले.

पारंपारीक पद्धतीने त्यांनी कीर्तन सादर केले. विचारांचे आदान प्रदान करत जुगलबंदी उत्तरोत्तर रंगत गेली.तसेच भक्त आणि नारायण यांच्यामधील भावबंध उलगडले.श्रेयस बडवे आणि सौ. मानसी बडवे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून आणि त्याचे निरूपण आणि आख्यान दरम्यान सादर केले.

पुणेकर रसिकांचा या कीर्तनाला चांगला प्रतिसाद मिळाला .

महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सवात हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, विवेक वेलणकर , नर्मदा परीक्रमाच्या अभ्यासक भारती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले आणि सूत्रसंचालन केले.

विवेक वेलणकर म्हणाले ” भारतीय विद्या भवन ने किर्तन महोत्सव हा स्तुत्य उपक्रम केला आहे. या उपक्रमाला शुभेच्छा आहेत .नर्मदा परीक्रमाच्या अभ्यासक भारती ठाकूर यांनी ही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

सप्ताह भर कथा कीर्तन

या मालिकेतील सहावे पुष्प शनिवार ,दिनांक २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने गुंफले जाणार आहे.

महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान ” कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या” या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ माध्यमतज्ञ प्रा.डॉ. विश्राम ढोले, तत्वज्ञान व प्राच्य विद्या यांचे अभ्यासक व संशोधक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

याच दिवशी सायंकाळी सहा वाजता कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रारंभी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे “महाभारतातील किर्तन परंपरा” यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे.

भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.प्रवेश मोफत आहे.
……………………

Latest News