32 लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलंय. 24 डिसेंबरला सगळ्यांना प्रमाणपत्र मिळेल- मनोज जरांगे पाटील

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ते म्हणाले, ”मुंबईत आमच्या भाकरी घेऊन येणार मात्र कांदा सोडून. फक्त बाथरूमची व्यवस्था करा. आमच्या जातीच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही कुठल्याही टोकाला जाणार. मी म्हटलं तर मुंबईत दोन कोटी मराठे येतील. आम्हाला मुंबईला यायचं नाही, मात्र तुम्ही आमच्याशी दगाफटका करू नका

”32 लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेलंय. 24 डिसेंबरला सगळ्यांना प्रमाणपत्र मिळेल, त्याच्याशिवाय मागे हटणार नाही. मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही छगन भुजबळ यांना लक्ष्य करत जरांगे पाटील म्हणाले,तुम्हाला जाहीर सांगतो. आम्हाला मराठ्यांना केस पडून काही होत नाही. आम्ही विसरलो नाहीत, माझ्या आईला मार लागलेला आहे, मातामाऊल्यांना मार लागलेला आहे. याचा हिशोब होणार.

तुम्ही आमचा अंत पाहू नक ”दबावामुळे मराठ्यांचे आरक्षण मिळाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विनंती आहे, याच्या दबावात येऊन तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर, गाठ मराठ्यांशी आहे.”

मराठा आंदोलक पुन्हा एकदा भव्य मराठा मोर्चा काढत मुंबईत धडकू शकतात, याचे संकेत आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. जालना येथे झालेल्या सभेत त्यांनी याबाबत संकेत दिले आहेत. ते म्हणाले आहेत की, ”17 डिसेंबरला मराठा समाजाची होणार बैठक होणार आहे. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार. ही बैठक आंतरवाली सराटी येथे होणार आहे. आम्ही मुंबईला येणार आणि सर्वकाही बघणार.”

Latest News