संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल – शरद पवार


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मराठा आरक्षणावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ‘संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका घेतली, याबाबत केंद्र सरकारनं भूमिका घेतली पाहिजे. एका बाजूनं एक समाज आरक्षणाची मागणी करतो. मात्र, दुसऱ्या वर्गाला आरक्षणाला धक्का लागण्याची भीती आहे. मात्र, त्यांच्या हिताला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं’.’मराठा आरक्षणामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न , शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे झालेले नुकसान याकडे दुर्लक्ष होतंय हे खरं आहे. याकडे दोन्ही सरकारने लक्ष घातलं पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केले.देशात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांची मतमोजणी रविवारी सुरु आहे. या चार विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या मतमोजणीतून चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात काही राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तर तेलंगणा वगळता इतर राज्यात काँग्रेसचा पराभव निश्चित मानला जात आहे. या ४ राज्याच्या निकालावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘याच्या पेक्षा वेगळा निकाल लागेल अशी आमच्याकडे माहिती नव्हती, असं शरद पवार म्हणालेपुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, ‘दोन राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे भाजपने तिथ लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यात राजस्थानमध्ये पाच वर्षे काँग्रेसची सत्ता होती. तेथील जनतेला नव्या लोकांना सधी द्यावी, असा मूड तेथील जनतेचा दिसत आहे. त्याला साजेसा निकाल तेलंगणाच्या निकालावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ‘ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांची सत्ता जाईल असं वाटत होतं. राहुल गांधी यांची एक सभा हैदराबादमध्ये झाली. राहुल गांधी यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्यांची सभा पाहून आम्हाला खात्री झाली की परिवर्तन होईल’. आता सर्व सुरुवातीचे कल आहेत. सायंकाळी ५.३० नंतर निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. ४ राज्यातल्या निकालानंतर मंगळवारी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. त्यात बैठकीत ४ राज्यांच्या निकालावर जाणकारांच मत जाणून घेणार आहोत