मराठी पाट्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मध्ये बैठक


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – मराठी पाट्यांबाबत महापालिकेचे आडमुठी धोरण असल्याने पाट्या लावण्यास अडचणी येत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
दुकानांवरील मराठी पाट्यांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला मराठी पाट्या संदर्भात पुणे शहरातील व्यापारी (Pune) संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडली .
या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. मनसेच्या (MNS) मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या १५ दिवसात पुणे शहरातील ४० हजार व्यापारी दुकानांवर मराठी पाट्या लावणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला.
अनेक शहरांमध्ये मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांना मनसेने खळखट्याळ इशारा दिलाय.तीन दिवसांपूर्वी पुणे शहरातील जंगली महाराज रस्ता व टिळक रोडवरील मराठी पाट्या नसलेल्या दुकानाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आज मनसे पदाधिकारी आणि शहरातील व्यापाऱ्यांमध्ये बैठक पार पडली
पुणे शहर ध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थितीत होते तर व्यापारी महासंघाकडून फत्तेचंद रांका, ग्राहक मंचाचे सूर्यकांत पाठक यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते.तसेच व्यापाऱ्यांच्या इतरही काही अडचणी आहेत,
यांच्याशी बैठक करून त्या सोडवण्यात येतील, असे आश्वासनही देण्यात आले आहे. दरम्यान, मराठी पाट्यांसंदर्भात व्यापारी महासंघाने सकारात्मक पाऊल उचलल्याने मनसे पदाधिकारी स्वागत व्यक्त केले आहे.