१० डिसेंबर रोजी पुण्यात गांधी दर्शन शिबीराचे आयोजन

१० डिसेंबर रोजी पुण्यात गांधी दर्शन शिबीराचे आयोजन

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर होणार आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी( गांधी समजून घेताना ),डॉ. कुमार सप्तर्षी( सत्याग्रहशास्त्र ), प्रा.एस. इरफान हबीब( विचार आणि वारसा) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.’

‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे आठवे शिबीर आहे. अधिक माहितीसाठी सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) – ७८८७६३०६१५,संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ) – ९८६०३८७८२७,सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) – ९०९६३१३०२२ यांच्याशी संपर्क साधता येईल.शिबिरासाठी शंभर रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यात शिबिरस्थळी नाश्ता,चहा आणि भोजनाचा समावेश आहे.

Latest News