Pune: ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक….


Pune: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक केली आहे. ससून रुग्णालय येथील ड्रग्जबाबत चौकशी अहवाल शासनास काही दिवसांपूर्वी दिला होताशासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथक प्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला होता.या चौकशीत अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते दोषी असल्याचे दिसून आले होते. डॉ. प्रवीण देवकाते यांच्या निगराणीखाली ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेत होता.
ड्रग्समाफिया ललीत पाटील प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी जसजसी पुढे सरकत आहे तशी आरोपींची संख्येतही वाढ होताना दिसत आहे. ललील पाटील प्रकरणात आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.पुणे पलिसंच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक केली. डॉ प्रवीण देवकाते हे ससून रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत होते. देवकाते यांनी ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवला, अशी माहिती तपासातून समोर आलीडॉ. देवकाते यांच्या निगराणी खाली ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेत होता. डॉ. देवकाते हा ललित याचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांच्या संपर्कात होता.ललित पाटील पळून जाण्याचा काही दिवस आधी डॉ. देवकाते यांनी भूषण याच्याशी संपर्क केला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाने या आधीच देवकाते यांचे निलंबन केले आहे.