काँग्रेस शहराध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयास सदिच्छा भेट!


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगारनेते डॉ. कैलास कदम यांनी काँग्रेसच्या पदाधिकार्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मा.तुषार कामठे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन सभा पार पडली.
याप्रसंगी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी नुकतेच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यालयाच्या उदघाटनाच्या निमित्ताने पक्षाला शुभेच्छा दिल्या.आणि डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करताना,संविधानाशी
काँग्रेसची असलेली असलेली बांधिलकी स्पष्ट केली.आगामी काळात महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्यासंदर्भात आपली भूमिका विशद केली.त्याअगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मा.तुषार कामठे यांनी पुरोगामी विचारांचा वारसा सांगत संविधानाबद्दल आपली आस्था व्यक्त केली.आगामी काळात ‘मिशन महापालिका’ संदर्भात आपलं पोलिटिकल व्हिजन मांडलं. पुढील सर्वच निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे जाण्याचा आपला मनोदय जाहीर केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,प्रदेश सरचिटणीस राजन नायर,शहर सरचिटणीस जयंत शिंदे,ज्येष्ठ नेते काशिनाथ जगताप,काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेसच्या महिला नेत्या डॉ.मनीषा गरुड या सर्वांनीच संविधानाप्रती आपली कटिबद्धता व्यक्त केली.आणि राजकीय परिवर्तनासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुलक्षणाताई शिलवंत, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर, मुख्य प्रवक्ते माधव पाटील,शहर सरचिटणीस शकुंतला भाट आणि अशोक तनपुरे तसेच चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे,भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर आल्हाट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अनिल भोसले ,माणिक जैद पाटील,गणेश भांडवलकर,विनोद धुमाळ,राजू खंडागळे,विवेक विधाते,कमलेश वाळके,विजय अब्बड,झोपडपट्टी सेल अध्यक्ष गणेश काळे,अप्लसंख्यांक सेल अध्यक्ष अल्ताफ शेख,अर्बन सेल अध्यक्षा ज्योतीताई जाधव, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे,पर्यावरण सेल अध्यक्षा अनिता गव्हाणे , कामगार सेल अध्यक्ष संदीप यशवंत शिंदे,आयटी सेल अध्यक्ष राहुल गोडसे,ख्रिश्चन सेल अध्यक्ष शौल कांबळे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ,अमित तलाठी आदी मान्यवर उपस्तिथ होते.
शहर समन्वयक गणेश भोंडवे यांनी सर्वांचे आभार मानले.