नृपो ‘ चा दिवाळी स्नेह मेळावा ९ डिसेंबर रोजी


‘नृपो ‘ चा दिवाळी स्नेह मेळावा ९ डिसेंबर रोजी
* पुणे :नॉन रेसिडेंट इंडियन्स पॅरेण्टस् ऑर्गनायझेशन(नृपो)सदस्यांचा दिवाळी स्नेहमेळावा शनिवार,दि.९ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी १२ या दरम्यान महाराष्ट्र राज्य हाॅटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चे ‘यश रिजन्सी ‘सभागृह,शिवाजीनगर येथे होणार आहे. डॉ.कल्याणी मांडके या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत
.मृदुला मोघे यांचा ‘ एका पेक्षा एक- एकपात्री बहुरूपी ‘ हा मनोरंजनपर कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे. नॉन रेसिडेंट पॅरेण्ट ऑर्गनायझेशन(नृपो)चे अध्यक्ष बी. बी. कुलकर्णी,उपाध्यक्ष राजेन्द्र माहुलकर,सचिव व्ही. एस. देशपांडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘नृपोजगत्’ दिवाळी अंकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येणार आहे
. प्रा. वैदेही कुलकर्णी यांनी या दिवाळी अंकाचे संपादन केले आहे . परदेशात शिकत असणाऱ्या आणि स्थायिक असणाऱ्या पुणेकर युवक,युवतींचे पालक असणारे सुमारे २०० ज्येष्ठ सभासद या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत