व्यावसायिक मित्राचा मृत्यू साठी एका व्यक्तीने चक्क स्मशानभूमीत अघोरी पूजा….


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- )
व्यावसायिक मित्राचा मृत्यू होण्यासाठी एका व्यक्तीने चक्क स्मशानभूमीत जाऊन अघोरी पूजा केली. इतकंच नाही, तर त्याच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा यासाठी मंत्राचे पठण देखील केले. ही धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गावात घडली.या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
. हवेली तालुक्यातही असाच काहीसा प्रकार घडला, गणेश हा सावकार असून त्याची तक्रारदार अमोल मानमोड यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी आहे. काही दिवसांपासून व्यावसायिक कारणावरून दोघांमध्ये मतभेद झाले होते.यातून अमोल मानमोडे यांचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा, यासाठी चौधरी याने गुरुवारी रात्री स्मशानभूमीत वेगवेगळ्या अघोरी पूजा केल्या. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती तक्रारदाराला दिली. दरम्यान, मानमोडे यांनी चौधरीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत संशयित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गणेश तात्यासाहेब चौधरी असे अघोरी पूजा घालणाऱ्याचे नाव आहे.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात जादूटोण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्मशानभूमीत अघोरी पूजा केली जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य केल्याचे समोर आले होते.