Froud: लोन ट्रान्सफरच्या बहाण्याने 50 हजारांची फसवणूक…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )

– कोटक महिंद्रा बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज करून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपीने केदारे यांच्याकडून 50 हजार 971 रुपये घेऊन त्यांना कर्ज न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत (Bhosari) आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केदारे यांनी मोशी येथील त्यांच्या सदनिकेसाठी येस बँक कर्वे रोड पुणे यांच्याकडून 23 लाख 50 हजार रुपये 10.45 टक्के व्याजदराने 30 वर्षांच्या मुदतीसाठी घेतले. व्याजदर जास्त असल्याने ते इतर बँकेकडे चौकशी करत होते.

लोन ट्रान्सफरच्या बहाण्याने एका (Bhosari) व्यक्तीने 50 हजारांची फसवणूक केली. कमी व्याजदराने लोन करून देतो म्हणून त्यासाठी पैसे घेऊन लोन ट्रान्सफर करून न देता फसवणूक केली. ही घटना 16 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडली.

रामदास साहेबराव केदारे (वय 38, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8850183608 क्रमांक धारक मनीष पवार या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest News