पक्षी -प्राण्यांचा जीवघेणा ठरणा-या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला अटक,सहकारनगर पोलीस स्टेशनची कारवाई

सामान्य जनतेचा, पक्षी-प्राण्यांचा जीवघेणा ठरणा-या नायलॉन मांजाची विक्री करणारा सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन जेरबंद

पुणे प्रतिनिधी :शासनाने बंदी घातलेल्या घातक अशा पतंगाचे नायलॉन मांजाची बंडले विक्री करण्याकरिता आला आहे अशी माहिती प्राप्त होताच सहकारनगर पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी आरोपी ला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल केला आहें

शहरात नववर्ष आगमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो त्या निमीत्त मोठ्याप्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात परंतू त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो, नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणा-या सामान्य नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत तर कित्येक वेळा प्राणही गमवावे लागले आहे,

झाडांमध्ये आडकलेल्या माज्यामुळे कित्येक वेळा पक्षांचे जिव धोक्यात आले आहेत. नायलॉन मांजावर मा न्यायालयाने बंदी घातलेली आहे परंतु तरीही काहीजण अशा नायलॉन मांजाची बेकायदेशिर रित्या चोरून विक्री करतात त्याअनुशंगाने नायलॉन मांजाची चोरून विक्री करणा-या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले होते

दिनांक २७/१२/२०२३ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलींग फिरत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांचे बातमीदारामार्फत बातमी समजल्यावर पुणे सातारा रोडवरील पंचवटी इमारती पाठीमागील कॅफे पिटर हॉटेल जवळ फुटपाथवर धनकवडी पुणे येथे हि कारवाई केली आहें

शासनाने बंदी घातलेल्या घातक अशा पतंगाचे नायलॉन मांजाची बंडले विक्री करण्याकरिता आला आहे अशी माहिती प्राप्त होताच सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने यांचे सुचनांप्रमाणे तपासपथका कडील पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे व अंमलदार यांनी कॅफे पिटर हॉटेल धनकवडी जवळील परिसरात जावून मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम नामे वेदांत राकेश गाढ़ये, वय १९ वर्षे, धंदा शिक्षण, रा.रुम नं.१६, गल्ती नं.२, शंकर महाराज वसाहत, धनकवडी पुणे यास ०४/२० वा ताब्यात घेवून त्याचे ताथ्यातील पोत्याची झडती घेता त्यां घरामध्ये कि रु ४,४००/- चा नायलॉन मांजा विक्री करीता बाळगलेला मिळून आल्याने सदरचा मांजा जप्त करून वेदांत राकेश गाढवे, याचे विरुध्द सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सो। पश्चिम प्रादेशीक विभाग श्री प्रविणकुमार पाटील सोा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर सोो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, संदीप देशमाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, भुजंग इंगळे निलेश शिवतरे, सुशांत फरांदे, सागर सुतकर, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, सागर कुंभार यांनी केली आहे.

Latest News