भारत संकल्प यात्रेचा रथ पिंपरी-चिंचवड शहरात, नागरिकांचा चांगला प्रतिसाद- आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह


पिंपरी-: केंद्र सरकारच्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पिंपरी-चिंचवड शहरात फिरविण्यात आला होता. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनास शहरवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून या मोहीमेचा समारोप जूनी सांगवी येथील गजानन महाराज मंदिराजवळील व्यापारी केंद्र येथे करण्यात आला.
शहरात 28 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2023 अखेर शहरामध्ये 64 विविध ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पोहोचला असून हजारो नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध महत्वपुर्ण योजनांची माहिती व लाभ घेतला.
विकसीत भारत संकल्प यात्रेत एकूण 39 हजार 134 नागरिकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये 18 हजार 197 पुरुष तर 20 हजार 937 महिलांचा समावेश होता. 2 हजार 682 नागरिकांनी आधार कार्डचा लाभ घेतला. तर, 9607 जणांनी आरोग्य शिबीरास भेट देऊन त्यातील सुविधांचा लाभ घेतला
.
5 हजार 910 नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड केंद्रास भेट दिली. तसेच 2 हजार 487 उज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला तर पंतप्रधान स्वनिधी केंद्रास 3 हजार 464 नागरिकांनी भेट देऊन योजनांचा लाभ घेतला.
10 हजार 965 नागरिकांनी आत्मनिर्भर भारतासाठी सामूहिक आत्मनिर्भरतेची शपथ घेतली तर केंद्र सरकारच्या योजनांबाबत 152 जणांनी ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ मध्ये सहभाग घेतला
आणि योजनांबाबत त्यांची मते व्यक्त केली.शहरातील या मोहीमेत खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आण्णा बनसोडे, महेश लांडगे आणि अश्विनी जगताप, माजी नगरसदस्य, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.