अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नाट्य परिषदेने तीन स्तरावर काम केलं पाहिजे अभिनेते प्रशांत दामले

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)

नाट्य परिषदेने तीन स्तरावर काम केलं पाहिजे. निधी वाटप व्यवस्थित झाला पाहिजे. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. महत्वाची जबाबदारी प्रेषकाची आहे, त्यांनी पुढच्या पिढीला नाटक बघण्याची सवय लावली पाहिजे. शासन त्यांचे काम करत आहे.

नाट्यगृह जपण सोपं आहे,ती सुधारने गरजेचे आहे,पण त्या ठिकाणी योग्य लोक बसवणे गरजेचे आहे.. असेही प्रशांत दामले म्हणाले”दरम्यान, प्रशांत दामलेंच्या या फटकेबाजीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्यूत्तर दिले. प्रशांत दामले तुम्ही आता बोलले २४ तास कला साजरे करता. पण आम्ही नेते, तुम्ही अभिनेते आहात.

तुम्ही कला सादर केली की रसिक प्रेक्षक टाळ्यांमधून दाद देतात. आम्ही लोकसेवकाची भूमिका चोख बजावली तर मतदार मतपेटीतून दाद देतात. त्यामुळं मेहनत दोघांना ही करावी लागते, पण आमच्यापेक्षा तुमची मेहनत अधिक आहे..

. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सध्या पुण्यामध्ये सुरू आहे. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाट्य यात्रा काढण्यात आली.

आज (शनिवार, ६ जानेवारी) या नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आदी नेते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांनी चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी बोलताना व्यासपिठावर जेष्ठ मंत्रीमंडळ बसले आहेत, आम्ही कलाकार तीन तास अभिनय करतो. पण २४ तास अभिनय करणारी मंडळी मंचावर आहे, बसणारे ते ३६५ दिवस अभिनय करत असतात.. अशी मिश्कील टिप्पणी प्रशांत दामले यांनी केली. तसेच नाट्य परिषद अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय

Latest News