‘ संगीतसुधा’ कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध !

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे ः ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ संगीतसुधा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दीपश्री फाटक – शेठजी (अमेरिका) यांनी सादर केला . त्यांनी शास्त्रीय, उप शास्त्रीय, आणि सुगम संगीत सादर केले . त्यांना पुष्कर महाजन (तबला), लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. संजय गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

हा कार्यक्रम शनीवार,७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.दीपश्री फाटक – शेठजी यांनी यमन रागातील ‘श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारूणम् ‘ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. यमन रागातील ‘ येरी आली पिया बीन ‘ ही बंदीश सादर केली.
सायंकालीन राग पूरीया धनश्री या रागातील भावगीत जिवलगा, राहिले दूर घर माझे ! यानंतर ‘पायलिया झंकार मोरी ‘ ही बंदीश आणि तराना सादर केला.
तिलंग रागातील ठुमरी ‘श्याम सुंदर मदन मोहन ‘,
मधुकंस रागातील लोकप्रिय भावगीत ‘मी राधिका , मी प्रेमिका’, तसेच ‘संत चोखामेळा यांचा ‘जोहार मायबाप जोहार ‘ हा अभंग सादर केला. ‘ संगीत सुधा ‘ मैफिली ची सांगता अठरा रागांच्या रागमालेने झाली. या सादरीकरणाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १९९ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार करून प्रास्ताविक केले.

Latest News