अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत…

आपला आवाज आपली सखी सभासदांचा उदंड प्रतिसाद
पिंपरी – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-, दि. 6 – प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री तथा धडधक गर्ल माधुरी दीक्षित या प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरात आल्या होत्या. ढोल ताशा व लेझीमच्या गजरात आणि आपला आवाज आपली सखीच्या सभासदांनी माधुरी दीक्षित यांनी विविध भूमिकेनुसार वेशभूषा करीत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तसेच, त्यांची भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड शहरवासियांकडून झालेले अनोखे स्वागत पाहून त्या हरखून गेल्या.
आपला आवाज आपली सखी यांच्या वतीने पंचक चित्रपटाच्या प्रीमियर शोचे चिंचवड येथील एल्प्रो मॉल येथे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्यासह डॉ. श्रीराम नेने, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री तेजश्री प्रधान व इतर कलाकार या वेळी उपस्थित होते.
आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे व कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांचा पुणेरी पगडी आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती देऊन सन्मानित केले. यावेळी हजारोच्या संख्येने आपला आवाज आपली सखी सभासदांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी साकारलेल्या विविध भूमिकेनुसार असंख्य सखींनी वेशभूषा केली होती.माधुरी दीक्षित यांच्या प्रतिमेची रेखाटलेली भव्य व सुंदर रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. ढोल ताशा व लेझीम यांच्या गजरात उपस्थित कलाकारांचे स्वागत करण्यात आले. माधुरी दिक्षित यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सखींनी माधुरी दीक्षित यांच्यासोबत छायाचित्र व सेल्फी काढले. त्यांची छबी टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल क्लिक होत होते.
सखींनी एल्पो मॉलमधील मल्टिप्लेक्समधील पंचक चित्रपटांचे सर्व शो बुक केले होते. सखींनी सहकुटुंब पंचक चित्रपटाचा आनंद लुटला.