निकाल बाजूने लागला, तर मॅच फिक्सिंग नाही आणि मेरीटवर निकाल येतो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

उद्धव ठाकरे यांनी मॅच फिक्सिंग असल्याच निकालावर म्हटलय. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “निकाल बाजूने लागला, तर मॅच फिक्सिंग नाही आणि मेरीटवर निकाल येतो, तेव्हा मॅच फिक्सिंग. निकाल विरोधात गेला, तर ते निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाला सल्ला देतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?” “लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर 2019 मध्ये जनतेने शिवसेना-भाजपा युती म्हणून निवडून दिलं होतं” याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करुन दिली.“लोकशाहीमध्ये कोणालाही पक्ष संघटना मालमत्ता मानून मनमानी निर्णय घेता येणार नाही, हे सिद्ध झालय. भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून तसच शिवसेना खरी कोणाची? याला सुद्धा मान्यता दिलीय” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “हा निर्णय स्वागतार्ह आहे, यापुढे अशा प्रकारची मनमानी कोणाला करता येणार नाही हे सिद्ध झालं” असं शिंदे म्हणाले.महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निकाल दिला. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालानंतर अखेर सत्याचा विजय झाला, लोकशाही, हिंदुत्वाचा विजय झाला” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “एकाधिकारशाही, घराणेशाही, मक्तेदारी यांना चपराक मिळाली. त्यांचा पराभव झाला” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने जी निरीक्षण नोंदवलेली, त्यापेक्षा वेगळा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “निकालाबद्दल कायदेशतज्ज्ञांशी बोलू. निकालावर चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ. आजच्या निकालात मनमानी कारभारावर बोट ठेवलय” असं शिंदे म्हणाले. आजचा निकाल हा उद्धव ठाकरे गटासाठी झटका आहे.