डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इंस्टीटयूट, बंगलूरू, संचालक,डॉ.भाग्यलक्ष्मी राज्याच्या दौऱ्यावर,सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांची सदिच्छा भेट

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मुंबई (दि.११/०१/२०२४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इंस्टीटयूट बंगलुरु,कर्नाटक येथील संचालक डॉ .भाग्यलक्ष्मी या महाराष्ट्र राज्याच्या अभ्यास दौ-यावर आलेल्या आहेत. आज दि.११ रोजी त्यांनी राज्याच्या सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम समजून घेण्यासाठी श्री सुमंत भांगे, सचिव , सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांची मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेतली आहे. सचिव श्री.सुमंत भांगे यांनी राज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर सर्व समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विभाग विविध उपक्रम तसेच योजना राबवित आहे,त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच चैत्यभुमी मुंबई, दिक्षाभुमी, नागपुर व बार्टी पुणे तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी चालू असलेल्या विकास कामांची माहिती करून दिली.
डॉ.भाग्यलक्ष्मी या कर्नाटक स्टेट केडर मधील वरिष्ठ अधिकारी असून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे विविध उपक्रम तसेच राबविण्यात येत असलेल्या विविध योजना बाबत त्या प्रभावित झाल्या. कर्नाटक राज्यात महाराष्ट्र प्रमाणे योजना व उपक्रम राबवण्याची इच्छा त्यांनी प्रसंगी व्यक्त केली.यावेळी त्यांनी श्री सुमंत भांगे,सचिव यांचा कर्नाटक मधील पारंपारिक पध्दतीची, वोड़ीयार राजघराण्याची पगडी घालुन सन्मान केला,तसेच विविध पुस्तके भेट दिली.यावेळी बार्टी पुणे चे महासंचालक सुनील वारे, सह सचिव दिनेश डिगंळे,अदि उपस्थित होते.

Latest News