आर्किटेक्ट जी.के.कान्हेरे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना जीवनगौरव


‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ची घोषणा
१३ जानेवारी रोजी कार्यक्रम
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ कडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ज्येष्ठ आर्किटेक्ट प्रा.जी.के.कान्हेरे, ज्येष्ठ स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना यावर्षी हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. असोसिएशन तर्फे प्रेसिडेंट पराग लकडे, उपाध्यक्ष राजीव राजे,चेअरमन महेश बांगड,सचिव संजय तासगांवकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दि १३ जानेवारी रोजी पी वाय सी हिंदू जिमखाना टेरेस येथे सायंकाळी ६ वाजता आर.बी.सूर्यवंशी(सिनियर चीफ एक्झिक्युटिव्ह ,बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि.) आणि जे.पी.श्रॉफ(अध्यक्ष,श्रॉफ ग्रुप) यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रत्येकी एक ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि एक ज्येष्ठ इंजिनियर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो.या पुरस्कारांचे हे १७ वे वर्ष आहे.
‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’:५४ वर्षांची परंपरा
‘आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ ही ५४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आणि नीतिमान सेवांना उत्तेजन देणे हा या संस्थेचा उद्देश आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊन नागरी,सामाजिक प्रश्नांवर कार्यरत राहण्यासाठी ही संस्था स्थापन झाली.सभासदांची वर्गणी आणि प्रयोजकत्वातून विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये चर्चासत्रे,प्रशिक्षण ,विविध पुरस्कारांचा समावेश आहे.
…………………………….