PUNE; ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक स्वामीनारायण मंदिरात घुसला…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- चालकाने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट स्वामीनारायण मंदिरात ( Pune) घुसला. ही घटना रविवारी (दि. 14) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास पुणे-बंगळूरू महामार्गावर घडली.रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास मुंबई-बंगळूरू महामार्गावरून जाणारा एक ट्रक नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराच्या प्रवेशद्वारात घुसला. ट्रकने दुचाकीला धडक दिली असून यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. नागरिकांनी जखमी दुचाकीस्वाराला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात ट्रक आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे. ट्रकने आणखी दोन कारला देखील धडक दिली असून त्या दोन कारचे देखील नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले ( Pune) आहे.