आळंदी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अतिक्रमनाचा विळखा

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर नव्यानेच टपरी व स्नॅक्स सेंटरच्या गाडीची अतिक्रमणात भर पडलेली दिसून येत आहे. एक बाजू टपरी, हातगाडी यांनी वेढलेलीच आहे. त्यात दुसऱ्या मोकळ्या बाजूच्या जागेत अतिक्रमण होताना दिसून येत आहे.

शिवस्मारका जवळ शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन असते.इतर कार्यक्रमाची सुरवात किंवा सांगता सुद्धा शिवस्मारकाच्या येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करत असतात

.यावेळी अनेक नागरिक उपस्थित असतात.यामुळे तेथील दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणा मुळे इतर कार्यक्रमाना बाधा निर्माण होणार आहे.

शिवस्मारक पालिकेच्या एकदी जवळ असून सुद्धा अतिक्रमण विभागाची डोळ्यावर पट्टी दिसून येत आहे. वडगांव रस्ता, नदीपलीकडील दर्शन बारी लगतच्या फुटपाथवर सुद्धा हातगाडी,टपरी व हॉटेल यांचे अतिक्रमण दिसून येत आहे

Latest News