22 जानेवारीला जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने, दारूचे दुकानें बंद ठेवा:शिवसेना


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
22 जानेवारीला 2024 ला पुणे जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने,दारूचे दुकाने,चिकन,मटन चे बंद ठेवण्याची मागणी शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर संघटक रवींद्र ब्रम्हे यांनी केली आहे
22 जानेवारी हा दिवस इतिहासात सोनेरी अक्षराने लिहला जाणार आहे. याचे साक्षी आपण सर्व जण होणार आहे हे आपल्या सर्व भारतीयांचे भाग्य आहे. सर्व हिंदू धर्मातील लोकांच्या भावना लक्षात घेता 22 जानेवारी 2024 ला संपूर्ण पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील कत्तलखाने, मटण, चिकन व दारूचे सर्व दुकाने बंद ठेवण्यात यावे
.प्रभू श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा ही हिंदूंच्या आस्थेशी जुडलेली आहे. म्हणून प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र दिवशी कोणत्या पशु,पक्ष्याची हत्या होऊ नये अशी सर्व हिंदूंची तीव्र भावना आहे, असे निवेदनात म्हटले आहे
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, येत्या 22 जानेवारी 2024 ला प्रभू श्रीराम यांची अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा महोत्सव पार पडणार आहे
, हा दिवस देशातील सर्व हिंदूंसाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र असा दिवस असणार आहे. कारण 500 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अयोध्या येथे प्रभू श्रीराम लल्लाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.